शहिद कैलास कालू दहिकर यांच्या पार्थिवावर आज दि. २७ डिसेंबरला दुपारी एकच्या सुमारास पिंपळखुटा येथे अंत्यसंस्कार होणार

0
696

_अमरावती_ : शहिद कैलास कालू दहिकर यांच्या पार्थिवावर आज दि. २७ डिसेंबरला दुपारी एकच्या सुमारास पिंपळखुटा येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहतील.

पालकमंत्र्यांच्या प्राप्त दौऱ्यानुसार , दु. १२.५० वाजता पिंपळखुटा येथे आगमन व शहीद दहिकर यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी १.४५ वाजता सावळी दातुरा येथे कविता बोरेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, दुपारी ४ वाजता तिवसा येथे अभ्यागतांच्या भेटी, सायंकाळी ७.४५ वाजता अमरावती निवासस्थानी आगमन व राखीव.
०००