प्राणांतिक अपघात टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या विशेष मोहीम  2 महिन्यात 4 हजार दंडात्मक कारवाया

0
364
Google search engine
Google search engine

आकोला

महाराष्ट्रात दरवर्षी रस्ते अपघातात शेकडो वाहन चालक मृत्युमुखी पडतात, रस्त्यावर घडणाऱ्या अपघाताचे महाराष्ट्राच्या वाहतूक विभागाने विश्लेषण केले असता अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या प्रमुख घटकां पैकी घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणे, धोकादायक रित्या वाहन चालविणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे, चुकीच्या बाजूने वाहन वळविणे किंवा चालविणे, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणे, सीट बेल्ट न लावता चारचाकी चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, ही प्रमुख कारणे समोर आली आहेत,

त्या करीता अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक मुंबई ह्यांनी मा.सर्वोच्च न्यायालयाचे सुचने नुसार महाराष्ट्रातील सर्व वाहतूक शाखेना ह्या बाबत धडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषणगाने अकोला शहर वाहतूक शाखेने मागील 28।10।20 पासून विशेष मोहीम सुरू केली होती, त्या मध्ये मर्यादे पेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणाऱ्या 770 , धोकादायक रित्या वाहन चालविणाऱ्या 45, मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या 7, चुकीच्या बाजूने वाहन वाळविणाऱ्या किंवा चालविणाऱ्या 98, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या 880, चारचाकी चालविताना सीट बेल्ट न लावणाऱ्या 1750, वाहन चालविताना मोबाईल वर बोलणाऱ्या 452 अश्या एकूण 4002 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्या

, सदर च्या कारवाया पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे निर्देशा प्रमाणे शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उप निरीक्षक सुरेश वाघ, व शहर वाहतूक शाखेच्या पोलीस अंमलदार ह्यांनी केल्या।
प्राणांतिक अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी दिलेल्या सुचने प्रमाणे वाहने चालवून अपघात टाळावा असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले आहे