_*ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020* – पहा नवीन अपडेट

0
2759
Google search engine
Google search engine

 

*नामनिर्देशन पत्रे आता पारंपारिक पध्दतीने स्विकारणार*

*निवडणूक शाखेची माहिती*

अमरावती, दि. 29 : ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी येत असल्यामुळे नामनिर्देशनपत्रे पारंपारिक पध्दतीने ऑफलाईन स्विकारण्यात येत आहेत. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची वेळ देखील 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

नामनिर्देशन व घोषणापत्रे यांचे कोरे नमुने इच्छुक उमेदवारांना संबंधित कार्यालयातून उपलब्ध करुन देण्यात येतील. पारंपारिक पध्दतीने स्विकारण्यात आलेले नामनिर्देशन पत्रे छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध नामनिर्देशन पत्रे संगणक चालकाच्या मदतीने आरओ लॉगीन मधून भरुन देण्यात येतील, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली आहे.

जात पडताळणीसाठीचे प्रस्तावही ऑफलाईन पध्दतीने छाननीच्या दिनांकापर्यंत स्विकारण्यात येत आहे, असेही कळविण्यात आले आहे. त्यानुसार अर्जदाराची संख्या लक्षात घेता कार्यालय पूर्ण वेळ व सर्व अर्जदारांचे अर्ज स्विकारेपर्यंत सुरु ठेवावी, असे निर्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने जात पडताळणी समित्यांना दिले आहे.

0000