श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालय अकोट येथे शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सभा संपन्न

0
547
Google search engine
Google search engine

आकोटः श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालय अकोट येथे अकोट पंचायत समिती शिक्षण विभाग, तालुका मुख्याध्यापक संघ व तालुका विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 रोजी शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले सदर शिबिर गटशिक्षणाधिकारी मा. श्री. विजयजी हाडोळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व नायब तहसीलदार मा. श्री. हरिषजी गुरव साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षकांची सभा संपन्न झाली. या सभेला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ श्री रविंद्रजी भास्कर सर, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष मा.श्री. मोहन खाडे, श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री विलासजी रोडे व जिल्हा विज्ञान मंडळाचे मा. श्री विश्वास जढाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या सभेला मा.हरिषजी गुरव साहेबांनी तसेच मा. विजयजी हाडोळे साहेब व डॉ रविंद्र भास्कर सर यांनी NMMS परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले.सभेचे प्रास्ताविक मनिष निखाडे यांनी केले तर सुत्र संचालन कु. सुरेखा माकोडे व सौ उज्वला तायडे यांनी व आभार प्रदर्शन गजानन चव्हाण यांनी केले. सभेला गट साधन केंद्राचे तृप्ती बिजवे, चंद्रशेखर तेलगोटे, सुनिल मस्करे, धन्दर सर, सर्व केंद्र प्रमुख, सर्व विषय साधन व्यक्ति तसेच विज्ञान अध्यापक मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या सभेला जवळपास 200 मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.