रिकॉर्ड ब्रेक 73500 वाहनांवर कारवाई व सामाजिक उपक्रम राबवणारी अकोला शहर वाहतुक शाखा अमरावती विभागात अव्वल

0
489
Google search engine
Google search engine

अकोलाःप्रतिनिधी

2020 ह्या मावळत्या वर्षात शहर वाहतूक शाखेने कारवाईचे सर्व रिकॉर्ड मोडीत काढून, अकोल्यात वाहतूक शाखा अस्तित्वात आल्या पासून आज पर्यंतच्या सर्वात जास्त कारवाया केल्या आहेत, सन 2020 ह्या वर्षी एकूण 73,500 वाहनांवर दंडात्मक कारवाया करून 72 लाख रुपयां पेक्षा जास्त दंड वसूल केला आहे,

रिकॉर्ड ब्रेक कारवाया व्यतिरिक्त अकोला शहरात वर्षभर सुरू असलेल्या प्रमुख रस्त्याचे बांधकामे ,उड्डाण पूल ह्या मुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून वाहतूक कर्मचारी कार्यरत होते तसेच लॉक डाऊन च्या काळात सुद्धा शहर वाहतूक विभागावर महत्वाची जबाबदारी होती, ह्या जबाबदाऱ्या पार पाडीत शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके व पोलीस अंमलदार ह्यांनी ह्या रिकॉर्ड ब्रेक कारवाया केल्या हे विशेष

मागील वर्षी पेक्षा तब्बल 14 हजार कारवाया केल्या जास्त
शहर वाहतूक शाखेने मागील 2019 ह्या वर्षी 59 हजार 540 वाहनांवर दंडात्मक कारवाया केल्या होत्या, मागील वर्षी पेक्षा ह्या वर्षी तब्बल 14 हजार कारवाया जास्त करण्यात आल्या आहेत।
कारवाया सोबत सामाजिक उपक्रम राबविण्यातही अग्रेसर
शहर वाहतूक शाखेने फक्त रिकॉर्ड ब्रेक कारवाया केल्या नसून सरत्या वर्षात सामाजिक उपक्रम सुद्धा राबविले

ज्या मध्ये करोना लॉक डाऊन काळात एकट्या जेष्ठ नागरिकां साठी ।। एक कॉल करा मदत मिळवा।। ही मोहीम यशस्वी रित्या राबवून अनेक जेष्ठ नागरिकांना वैद्यकीय मदत, वाहने, राशन, व आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली, ऑटो बंद असल्याने उपासमार होत असलेल्या काही आजारी व गरीब ऑटो चालकांना राशन वाटप केले, करोना वारीयर्स वॉल पेंटिंग स्पर्धा आयोजित करून कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले, करोना संक्रमण कमी करण्यासाठी दंडात्मक कारवाई सोबत सर्वसामान्य नागरिकां मध्ये जनजागृती करण्यासाठी नो मास्क नो फ्युएल, नो मास्क नो बुक्स, नो मास्क नो डील, नो मास्क नो राशन, नो मास्क नो सवारी, नो मास्क नो राईड ह्या मोहिमा यशस्वी पणे राबविल्या त्या पैकी नो मास्क नो सवारी ह्या उपक्रमाची मा मुख्यमंत्री ह्यांनी दखल घेऊन कौतुक करून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचे निर्देश दिले,

फटाके फोडणाऱ्या बुलेट गाड्या विरुद्ध विशेष मोहीम राबवून कडक कायदेशीर कारवाई सोबत सायलेन्सर बदलून घेऊन मगच गाड्या सोडून सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेतली, करोना काळा मुळे रक्ताची कमतरता लक्षात घेऊन पोलीस अंमलदार व कुटुंबीयांचा रक्तदान शिबिर आयोजित करून रक्त दान करून शासनाचे आवहनाला तात्काळ प्रतिसाद दिला। वर्षभर पोलीस अधीक्षकांच्या व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेने धडक कारवाया व सामाजिक उपक्रम ह्या दोन्ही आघाडीवर भरीव कामगिरी केली।