शहर वाहतूक पोलिसांचा असाही प्रामाणिक पणा, रस्त्यावर पडलेला मोबाईल व पैशाचे पाकीट केले परत।

0
402

अकोलाः

शहर वाहतूक शाखा अकोला येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण गंगाखेडकर हे स्थानिक कोतवाली चौकात कर्त्यव्यावर हजर असतांना त्यांना रस्त्यावर एक मोबाईल व पाकीट पडलेले दिसले त्यांनी सदर मोबाईल व पाकीट ताब्यात घेऊन पाकिटात शोध घेतला असता त्या मध्ये वाहनाची नोंदणी प्रमाणपत्र व वाहन चालविण्याचा परवाना मिळून आला त्या वरील पत्ता स्थानिक उमरी येथील असल्याने व वाहतूक कर्मचारी सुद्धा त्याच परिसरात राहत असल्याने त्यांनी आणखी शोध घेतला असता त्यांना सदर मोबाईल व महत्वाचे मूळ कागदपत्रे असलेले पाकीट उमरी येथील चंदू गवारे ह्यांचे असल्याचे समजले त्यांनी त्यांचे ओळखीचे त्या परिसरात राहत असलेल्या मित्रा कडून चंदू गवारे ह्यांना निरोप दिला असता, महागडा मोबाईल व महत्वाचे कागदपत्रे असलेले पाकीट हरविल्याने अगोदरच परेशान असलेल्या गवारे ह्यांना आनंद झाला व ते त्वरित कोतवाली चौकात पोहचले , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण गंगाखेडकर ह्यांनी खात्री करून महागडा 20 हजार रुपये किंमत असलेला मोबाईल व पाकीट परत केले, वाहतूक पोलीस अमलदाराच्या प्रामाणिक पणा बद्दल चंदू गवारे ह्यांनी त्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले।