शहर वाहतूक अमलदाराने वकीलाचा हरविलेला महागडा मोबाईल केला परत

0
712
Google search engine
Google search engine

अकोलाःजिल्ह्याचे पालकमंत्री बचूभाऊ कडू ह्यांच्या अकोला दौऱ्या निमित्ताने शहर वाहतूक शाखेने चोख बंदोबस्त लावला होता, स्थानिक सिव्हील लाईन चौकात शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार दीपक सोनकर व विजय अदापुरे हे कर्त्याव्यावर हजर असतांना त्यांना एक महागडा मोबाईल रस्त्यावर पडलेला दिसला, त्यांनी तो आपल्या ताब्यात घेतला असता तो स्क्रीन लॉक असल्याचे आढळले, तेवढ्यात त्या मोबाईल वर फोन आला असता फोन कर्त्याने सांगितले की तो मोबाईल त्यांचा असून त्यांनी स्वतः चा परिचय ऍड रितेश अग्रवाल रा गोरक्षण रोड अकोला असे असून ते संध्याकाळी सिव्हिल लाईन चौकातून जात असतांना तो खिशातून खाली पडला पण त्यांचे लक्षात आले नाही, घरी गेल्या नंतर मोबाईल आढळून न आल्याने त्यांनी मोबाईल वर फोन केला असता शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मोबाईल त्यांचे कडे सुरक्षित असून येऊन मोबाईल घेऊन जाण्यास सांगितले, ऍड रितेश अग्रवाल ह्यांनी सिव्हिल लाईन चौकात पोहचून शहर वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक सोनकर व पोलीस अंमलदार विजय अदापुरे ह्यांचे कडून मोबाईल प्राप्त करून पोलीस अंमलदार ह्यांचे आभार व्यक्त केले।

शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांनी सातत्याने कर्त्यव्य बजावत असतांना नागरिकांचे हरविलेले पाकीट, मोबाईल, महत्वाचे कागदपत्रे वेळोवेळी परत करून एक विश्वास संपादन केला आहे।