आकोटमधील रुद्रम झाडे या कृषी पदवीधर तरुणाने केली काळ्या गव्हाची लागवड

0
1736
Google search engine
Google search engine

आकोटःसंतोष विणके

तालुक्यातील रुद्रम मिलींद झाडे या कृषी पदवीधर तरुणाने आपल्या शेतात एक प्रयोग म्हणून काळा गहू पेरला आहे. त्याच्या प्रयोगाचे कुतुहल म्हणुन ईतर शेतकऱ्यांनी पण काळ्या गव्हाच्या पेरणी केली आहे. या प्रयोगशील कृषी पदवीधर शेतकरी पुत्राने त्याच्या आकोलखेड शिवारातील शेतात काळ्या गव्हाची अर्ध्या एकरावर लागवड केली आहे.

त्याने यूट्यूबवर एक व्हिडिओ पाहिला.यात त्याला काळ्या गव्हाच्या लागवडीची माहीती मिळाली.हा गहू सामान्य गव्हापेक्षा खूप पौष्टिक होता आणि रुद्रम याने याबद्दल अधिक संशोधन केले.त्यावेळी त्याला पंजाबच्या नॅशनल ॲग्री – फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या डॉ . मोनिका गर्ग यांनी हा गहु शोधल्याचे माहीती पडले.काळ्या गहूत सामान्य गहूपेक्षा 60 टक्के जास्त लोह सामग्री आहे तसेच इतर प्रथिने आणि पोषक देखील असतात तसेच हा गहु शुगर असणाऱ्या करीताही फायद्याचा असल्याची माहीती आहे.

सामान्य गहूपेक्षा काळा गहू हा एक आयोग्यदायी पर्याय म्हणून जनतेसमोर येत आहे.रुद्रम याने हा काळ्या गव्हाचे बियाणे पंजाब येथुन आणले असुन ईतर शेतकऱ्यांसाठी पन तो या काळ्या गव्हाच्या बियाणे उपलब्ध करुन देतो आहे.त्याच्याकडे आतापर्यत कोल्हापुर ईगतपुरी नाशिक सांगली जयसिंगपुर आदी ठीकाणच्या शेतकऱ्यांनी काळ्या गव्हाचे बियाणे लागवडीसाठी नेले आहे तर तालुक्यातील आकोलखेड शिवारात अनेक शेतकऱ्यांनी या गव्हाच्या बियाण्यांची लागवड करत मागणी केली आहे.