ट्रॅक्टर रॅलीने झाली दोन दिवाशीय उपवास आंदोलनाची सांगता

0
460

ट्रॅक्टर रॅलीने झाली दोन दिवाशीय उपवास आंदोलनाची सांगता

शेगांव :- दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील व दिपक सलामपुरिया आणि त्यांचे सहकारी यांनी २ दिवशीय उपवास आंदोलन केले तर या आंदोलनाला विविध माध्यमातून समर्थन सामान्य जनतेने, शेतकऱ्यांनी दिले, तसेच अनेक राजकीय व्यक्तींचा या आंदोलनाला पाठिंबा मिळाला त्यात माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, काँग्रेसचे जळगाव जामोद पक्ष नेत्या स्वातीताई वाकेकर, शाम उमाळकर, राहुल बोंद्रे, राष्ट्रवादीचे भूषण दाभाळे यांनी आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी उपस्थित राहून आपले सर्मथन जाहीर केले संपूर्ण आंदोलनाला आपापल्या परीने प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला परंतु सरते शेवटी आंदोलनाच्या समर्थनार्थ आलेल्या काही नेत्यांनी मीडियावर बोट ठेवत टीकात्मक भाष्य केले आणि केंद्र सरकारवर तोंड सुख घेतले मोदी चले जावोच्या घोषणा करत शेतकऱ्यांसाठी बनवलेल्या कायद्यांना कळे कायदे संभवून आंदोलनाची सांगता उपवास कर्त्यांनी गांधी चौक ते तहसील कार्यालय रात्री आठ वाजता ट्रॅक्टर रॅली कडून हे कायदे रद्द करण्याचे निवेदन तहशिलदार शिल्पा बोबडे यांना दिले आणि हे कायदे जर रद्द नाही केले तर संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस आणि आमचे नेते असेच आंदोलन करणार असा सरकारला ईशारा दिला तर एकीकडे मतदार संघात शैलेन्द्र पाटील व दिपक सलांपुरीया हे विधानसभेचे नेतृत्व तर करणार अशी कुचबुच आंदोलना दरम्यान सुरु होती