बाल कीर्तनकार ह-भ-प कु ज्ञानेश्वरी दीदी शेटें यांच्या कीर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध

0
1150
Google search engine
Google search engine

अकोटःसंतोष विणके

स्थानिक शिवाजी कॉलेजच्या मागे असणाऱ्या सुखशांती कॉलनीमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दहा वर्षीय बाल कीर्तनकार ह-भ-प कु ज्ञानेश्वरी दीदी शेटे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. बाल कीर्तनकार ज्ञानेश्वरी या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले होते.

कार्यक्रमांमध्ये भाविकांनी उस्फूर्त प्रतिसाद दर्शविला असून या अखंड हरिनामाचा काल सातवा दिवस होता. कोरोना काळानंतर कीर्तन सेवा सुरू झाल्याने अनेक भाविकांना या कीर्तनातून अध्यात्मिक शांती मिळाली.कीर्तनामध्ये प्रमुख उपस्थिती हभप गणेश महाराज शेटे अशोक महाराज जायले, मोहन महाराज रेडे, मधुकर महाराज ठाकरे, प्रविण महाराज कुलट, विक्रम महाराज शेटे, सोपान महाराज कोरडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली या सर्व कार्यक्रमाचे आयोजन ह.भ.प. श्री मंगेश महाराज ठाकरे यांच्याकडे असुन सुख शांती कॉलनीतील सर्व मंडळींनी तन-मन-धनाने कार्यक्रमास सहकार्य केले