गो. सी. टोम्पे महाविद्यालयात देशातील सैनिकांना समर्पित भव्य रक्ततुला कार्यक्रम संपन्न

0
790
Google search engine
Google search engine

 

चांदूर बाजार :
स्थानिक गो.सी. टोम्पे महाविद्यालयात स्व. संजय टोम्पे व समीर देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या स्नेहनुबंध अभियानांतर्गत, देशातील सैनिकांना समर्पित फुबगाव येथील शहीद विजय वासुदेवराव पळसपगार यांच्या मातोश्री श्रीमती शोभा वासुदेवराव पळसपगार यांच्या रक्ततुलेचा कार्यक्रम आयोजित केला होता.

 

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव भास्करदादा टोम्पे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रवीभूषण आर. एम. ओ. कोविड हॉस्पिटल सुपरस्पेशालिटी, अमरावती, श्री रविंद्र कर्वे, सचिव अंबादेवी संस्थान, मा. नितीनभाऊ कोरडे नगराध्यक्ष चांदूर बाजार, मा. किशोर बेंद्रे, मा. सुनील किनगे ठाणेदार चांदूरबाजार, डॉ. राजेश बुरंगे संचालक, रासेयो, संगाबाअवि, अमरावती, मा. महेंद्र भुतडा अध्यक्ष रक्तदान समिती, श्री अजय दातेराव, डॉ. संजयजी तीरथकर, श्री प्रवीण बुंदिले, परवेज शेख, प्राचार्य संजय शिरभाते, श्री गोविंदभाऊ कासट, श्री सुनीलजी खराटे, संस्थेचे उपाध्यक्ष मधुकरराव नानोटे, डॉ. विजय टोम्पे, श्री मनोजभाऊ कटारिया, श्री टिकू आनंद, प्राचार्य राजेंद्र रामटेके, श्रीमती शोभा पळसपगार प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून रासेयो कार्यक्रम अधिकारी मंगेश अडगोकर यांनी कार्यक्रम आयोजनामागची भूमिका सविस्तर विशद केली. तर डॉ. रवीभूषण यांनी सद्यस्थितीत रक्ततुलेचा हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याची भावना व्यक्त केली. रासेयो संचालक डॉ. राजेश बुरंगे म्हणाले की, माणसाला समाजाचे काही देणे लागते. आपली संस्था ही देशाकरीता शहीद सैनिकाच्या आईचा रक्ततुला करुन समाज उपयोगी असे कार्यक्रम राबविते, हे देशहितासाठी मोठी गौरवाची बाब असल्याची भावना व्यक्त करून कोरोना काळात अमरावती विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून समाजसेवेचे कार्य केले म्हणून खऱ्या अर्थाने ते कोरोना योद्धे आहेत. हा माझा सत्कार नसून हा विद्यार्थ्यांचा सत्कार असल्याचे प्रांजळ मत मांडले. शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे सचिव भास्करदादा टोम्पे यांनी रक्ततुलेचे हे पंधरावे वर्ष असून असेच सामाजिक कार्य घडत राहो. त्यात आपल्या सर्वांचे सहकार्य आहे असे म्हणून उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी पूढे बोलतांना ते म्हणाले महाविद्यालयाची एकुण विद्यार्थांची प्रवेशित संख्या बघता ही रक्तदान चळवळ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत घराघरापर्यंत पोहचवण्याचे काम आपले महाविद्यालय करेल आणि चांदूर बाजार परिसरातील रुग्णांना रक्त पूरवठा योग्यवेळी व्हावा याकरीता महाविद्यालय यावर्षीपासून गो.सी. टोम्पे महाविद्यालय रक्तदान समितीची स्थापना करण्याची घोषणा त्यांनी केली.
यावेळी संस्थेकडून कोरोनाच्या काळात केलेल्या कार्याची दखल घेऊन डॉ. रवीभूषण व डॉ. राजेश बुरंगे यांचा कोविड योद्धा गौरव सन्मानपत्र व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला तर श्रीमती शोभा पळसपगार यांचा साडी-चोळी पुस्तक देऊन सत्काराबरोबरच रक्ततुलाही करण्यात आली.

याप्रसंगी स्वर्गीय संजय टोम्पे व समीर देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या भव्य रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापक, परिसरातील नागरिक, विविध सामाजिक संघटना सहभागी होऊन एकूण 164 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
सदर रक्तदान शिबिरासाठी पी. डी. एम. सी. अमरावती येथील रक्तपेढी चमू डॉ. ऋचा सारडा , डॉ. , समीर कडू, दिनेश चरपे, हरीश खार, कुणाल वरघट, अमोल टेटू, अमित धरणे यांचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय शेजव यांनी केले तर आभार प्रा. प्रशांत देवतळे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.