रविंद्र इंगळे पुरस्काराने सन्मानित

44

अकोट: अकोट तालुका पत्रकार संघाचे सदस्य, सामजिक कार्यकर्ते रविंद्र उर्फ लकी इंगळे यांचा अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
अ. भा. पत्रकार परिषद मुंबई सलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने
अकोला निमवाडी येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अ.भा.मराठी पत्रकार परिषदचे राज्यध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने, जिल्हा पत्रकार संघाचे चिटणीस प्रमोद लाजुरकर यांची विशेष उपस्थिती होती. प्रसंगी पत्रकारीता सोबतच कोरोना काळात उत्कृष्ट जनसेवेचेकार्य केल्याबद्दल रविंद्र इंगळे यांचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.