*नागुढाणा फार्ममधील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूसदृश लक्षणे नाहीत – पशुवैद्यक पथकाची माहिती*

314

 

अमरावती, दि. 15 : धारणी तालुक्यातील नागुढाणा या गावातील पोल्ट्री फार्ममधील काही पक्षी मृत आढळले. त्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाच्या पथकानेही आज तिथे जाऊन तपासणी केली. त्यावेळी बर्ड फ्लूसदृश लक्षणे आढळून आली नाहीत, असे पथकप्रमुख तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे यांनी स्पष्ट केले.

डॉ. रहाटे म्हणाले की, आज आम्ही येथील पाच पक्ष्यांचे पोस्टमार्टम केले. त्यात पक्ष्यांना श्वसनसंस्थेशी संबंधित आजार आढळून आला. बर्ड फ्लूबाबत लक्षणे सकृतदर्शनी आढळत नाहीत. अद्यापपर्यंत जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्लू सदृश स्थिती आढळली नाही.

पूर्णपणे उकडलेले मांस व अंडी खाणे सुरक्षित आहे. अद्ययावत माहिती व शंकानिरसनासाठी 18002330418 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

000

जाहिरात