कडेगांव येथे एसटी स्टॅड समोरील व्यापारी संकुलात आयोध्देतील श्रीराम मंदीर निर्माण निधी संकलन अभियान कार्यालयाचे उदघाटन मोठ्या उत्साहात

0
1103
Google search engine
Google search engine

सांगली/कडेगांव न्युज.

आज दिनांक 15/01 /2021 रोजी कडेगाव St स्टँड समोरील व्यापारी संकुलात.. अयोध्येतील श्रीराम मंदीर निर्माण निधी समर्पण अभियान तालुका कार्यालयाचे उद्घाटन जयराम स्वामी महाराज वडगाव चे मठाधिपती ह.भ.प. विठ्ठल महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मजुर फेडरेशनचे सतिशरावजी देशमुख, कडेगाव तालुका संघचालक अण्णासाहेब पिसाळ, योगाचार्य दत्तात्रय पाटील गुरूजी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सदस्य राजाराम गरूड भाऊ , भाजपाचे कडेगांव तालुकाध्यक्ष धनंजय देशमुख, 1992 साली आयोध्देला गेलेले कार सेवक मुकुंद कुलकर्णी, जेष्ठ नेते सुरेश यादव, बाळासाहेब दणके पाटील, ह भ प भाऊसाहेब महाराज, ह भ प गणेश डांगे महाराज उपस्थित होते.
तालुक्याचे निधी संकलन अभियान कार्यालय उदघाटन प्रसंगी बोलताना कराड जिल्हा संपर्कप्रमुख डॉ.मकरंद बर्वे म्हणाले की, कडेगांव तालुक्यात निधी संकलनास प्रारंभ केला असुन त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अयोध्येत मंदिरासाठी श्रीराम जन्मभुमी तीर्थक्षेत्र न्यासातर्फे निधी संकलन महाअभियान सुरू झाले आहे. .कडेगांव तालुक्यात आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सर्व रामभक्त मिळून कडेगांव तालुक्यातील प्रत्येक गावात व घराघरात जाऊन प्रती व्यक्ति १० रूपये, किंवा प्रति कुटुंब १०० रूपये, व १००० रूपयांच्या कुपनाद्वारे निधी संकलन करणार असल्याचेही सांगितले.
प्रारंभी डॉ मकरंद बर्वे यांनी स्वतः आयोध्या मंदिरासाठी रू. ५०,०००/- पन्नास हजार रुपये व कडेगांवचे योगाचार्य दत्तात्रय पाटील गुरूजी यांनी रू. ४०,०००/-, चाळीस हजाराचा धनादेश मठाधिपती विठ्ठल महाराज यांच्या शुभहस्ते कडेगाव अभियान प्रमुख दिलीप मुळीक यांचेकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले तर आभार कडेगाव शहर निधी संकलन अभियान प्रमुख संतोष डांगे यांनी मानले
या अभियान कार्यालयाच्या उदघाटन समारंभास जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रविण कदम सर , कडेगाव मंडल अभियान प्रमुख श्रीजय देशमुख, प्रताप पंडीत, दिलीप झपाटे, नगरसेवक नितीन शिंदे, नगरसेवक उदय देशमुख, उद्योजक प्रकाश निरंजन, संभाजी देसाई, अमित डोळ, प्रसाद भस्मे, दिग्विजय देशमुख , उमेश मोहीते, शिवाजीराव पवार सर, यांचेसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते त्याच बरोबर तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.