आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने राहुल वाघमारेची मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया ! 

0
889
आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने राहुल वाघमारेची मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया !
वरुड प्रतिनिधी :
मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार वरुड मोर्शी तालुक्यातील रुग्णांचा ईलाज करण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णसेवा देण्यासाठी नेहमी तत्पर असतात, आमदार देवेंद्र भुयार यांनी ज्या गरिबांजवळ असाध्य रोगांवर उपचार करवून घेण्यासाठी पैसा नाही, ज्यांना मरणाशिवाय पर्याय नाही अशा रुग्णांना मदत करत आहे. त्यांनी आदिवासी व ग्रामीण भागांत राहणार्‍या गरीब व कोणीही वाली नसलेल्या रुग्णांना स्वास्थ्य सुविधा पुरवविण्याचे काम करीत आहे.
        वरुड येथून जवळ असलेल्या गोरेगाव येथील राहुल वाघमारे या युवकाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने मुंबई येथे हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.
           गोरेगाव येथील राहुल वाघमारे या युवकाचा २०१८ मध्ये अपघातात होऊन कमरेला जबर मार लागून अस्थिभंग झाला होता. नागपूर येथील खाजगी रुग्णालयात २ लक्ष रुपये खर्च करून सुद्धा राहुल वाघमारे यांच्या कमरेच्या डाव्या भागाची  हिप रिप्लेसमेंट ची शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाहि. राहुल वाघमारे यांच्या तब्बेतीची माहिती मिळताच आमदार  देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने  मुंबई  येथील हिंदुजा हॉस्पिटल मध्ये राहुलला दाखल करण्यात आले. व कमरेच्या उजव्या भागाचे हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया तात्काळ व मोफत करण्यात आली.
           दरम्यान वरुड तालुक्यात दौऱ्यावर असताना आमदार भुयार यांनी गोरेगाव येथे राहुलच्या घरी जाऊन भेट  घेतली व तब्बेतीची विचारपूस केली. यावेळी राहुलची नागपूरला अयशस्वी  झालेल्या कमरेच्या डाव्या भागाची  शस्त्रक्रिया सुद्धा लवकरच मुंबई येथे करण्यात आली.
           आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने व सहकार्याने राहुल वाघमारे या युवकाचे चे जीवन सुकर झाल्याने परिसरातील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार व्यक्त केले.