पुंडा येथील बस स्टँड जवळील खड्ड्यामुळे शेतकऱ्याचा कुटाराचा ट्रॅक्टर पलटी.

0
408
Google search engine
Google search engine

सुदैवाने जीवितहानी नाही

आकोटःतालुक्यातील पुंडा येथील बस स्थानक जवळील असणाऱ्या खड्ड्यामुळे रात्री आठ वाजता दरम्यान कुटार वाहून नेणारा एक ट्रॅक्टर पलटी झाला हा परीसर वर्दळीचा भाग आहे. याठिकाणच्या नाली वरील खड्ड्यामुळे ट्रॅक्टर पलटी झाला.

सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी किंवा कुणालाही इजा झाली नाही मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार ग्रामपंचायत द्वारे पत्र व्यवहार करूनही झोपेचे सोंग घेतलेल्या संबंधितांमुळं आज शेतकऱ्यांचा कुटारचा ट्रॅक्टर पलटी झाला. रात्रीचा वेळ असल्याने जीवितहानी नसल्याचे गावकऱ्यांकडून बोलल्या जात आहे

. मात्र दिवसा या भागातून बरीच वर्दळ असते त्यामुळे एखादी अप्रिय घटना घडल्यास कोण जबाबदार असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण अपघात झालेल्या परिसरात शाळा, सार्वजनिक वाचनालय, बस स्टँड आणि घरे असल्याने सदरची नाली ही जीवघेणी ठरते आहे.