आमदार देवेन्द्र भुयार यांच्या हस्ते हिवरखेड येथे विविध विकासकामाचे  भूमिपूजन ! 

0
1292
Google search engine
Google search engine
आमदार देवेन्द्र भुयार यांच्या हस्ते हिवरखेड येथे विविध विकासकामाचे  भूमिपूजन !
मोर्शी तालुका प्रतिनिधी:
ग्रामीण भागात विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीतून विकासाला गती देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी आज हिवरखेड येथे विविध विकासात्मक कामाच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.
           या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी शिक्षण सभापती श्रीपादराव ढोमणे यांनी भूषविले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून हिवरखेड गावचे युवा सरपंच विजय पाचारे, हरिविजय ढोमने, अमोल महल्ले,  उमेश इंगोले, सतीश ढोमने, सुनील वासनकर, अनिल अमृते, मंगेश पवार, माणिकराव पाटील, सुधीर चौधरी, पंकज पाटील, गणेश धोटे, राजेन्द्र गडेकर, श्रावण पाचारे, रामेश्वर चव्हाण, राहुल ढोमने, अभिजित सावरकर, अभिजित निंभोरकर, राकेश ढोंगे, राहुल तिडके, अजय पाटील, प्रल्हादराव भोजने यांच्यासह आदी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.
         यावेळी हिवरखेड येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले त्यामध्ये हिवरखेड येथील 15 वा वित्त आयोग अंतर्गत 30 लक्ष रुपये,  जिल्हा क्रीडा विभाग अंतर्गत व्यायामशाळा बांधकाम 7 लक्ष रुपये, यांचा भूमिपूजन सोहळा तर तांडावस्ती सुधार योजने अंतर्गत 6 लक्ष रुपयाचे सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामाचा लोकार्पण  सोहळा संपन्न झाला.