आमदार देवेंद्र भुयार यांची वरुड तहसील कार्यालयात आकस्मिक भेट !  वरुड तहसील कार्यालयातील २२ अधिकारी / कर्मचारी गैरहजर ! 

0
1441
Google search engine
Google search engine
आमदार देवेंद्र भुयार यांची वरुड तहसील कार्यालयात आकस्मिक भेट !
वरुड तहसील कार्यालयातील २२ अधिकारी / कर्मचारी गैरहजर !
आमदार देवेंद्र भुयार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले कार्यवाही करण्याचे निर्देश !
वरुड तालुका प्रतिनिधी :
शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोमवार ते शुक्रवार असा पाच दिवसांचा आठवडा केला. कामकाजाचा आठवडा संपल्यानंतर शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांच्या सलग रजा उपभोगल्यानंतर वरुड येथील तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी शासकीय कर्मचाऱ्यांनी नियोजित वेळी म्हणजे ९.४५ वाजता कार्यालयात पोहचणे अपेक्षित होते. आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड घेतील तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता आकस्मिक भेट दिली असता  वरुड तहसील कार्यालयामध्ये अधिकारी/ कर्मचारी ३८ मंजूर पदे असून, कार्यरत 34 अधिकारी कर्मचारी आहे , त्यापैकी  22 कर्मचारी सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गैरहजर आढळले त्यामध्ये ४ नायब तहसीलदार, 3 अव्वल कारकून, ९ महसूल सहाय्यक, ५ शिपाई यांचा समावेश आहे.
       राज्य सरकारने पाच दिवसांचा आठवडा केल्यानंतरही सरकारी कार्यालयातील काही कर्मचारी कार्यालयात वेळेवर येत नसल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, शासनाच्या नव्या निर्णयाच्या आनंदाच्या भरात कामकाजाच्या बदललेल्या वेळा सुद्धा या मंडळींच्या लक्षात राहिल्या नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. दरम्यान, आमदार देवेंद्र भुयार यांनी सोमवार दिनांक २५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालय वरुड येथे भेट दिली असता ३४ कर्मचार्यांपैकी २२ कर्मचारी गैरहजर आढळून आले. सामान्य प्राशन विभाग शासन निर्णय क्रमांक समय- २०१६/प्र.क्र.६२/१८(र.व.का.),दि.२४ फेब्रुवारी,२०२०अन्वये राज्य शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसाचा आठवडा लागू करण्यात आला आहे. तसेच सोमवार ते शुक्रवार पर्यंत कार्यालयीन कामाची वेळ अधिकारी व वर्ग 3 कर्मचारी यांच्यासाठी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत केली असून वर्ग ४ कर्मचाऱ्यांसाठी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० अशी करण्यात आली आहे. राज्य शासनाने अधिकारी / कर्मचारी यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. परंतु अधिकारी / कर्मचारी त्यांची जबाबदारी व्यावस्थित पार पाडत नासल्यामुळे जनतेच्या कामात दिरंगाई होते. त्यासाठी उशिरा येणाऱ्या अधिकारी/ कर्मचारी यांचेवर तातकळ कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिले.
 नव्या बदलानुसार कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी केली आहे. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर हजर राहणे बंधनकारक आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. कर्मचारी खरच वेळेवर येतात का, याची तपासणी सोमवारी आमदार देवेंद्र भुयार यांनी केली. यामध्ये बहुतांश कर्मचारी वेळेवर हजर नव्हते. मात्र, काही कर्मचारी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे उशीरा आल्याचे दिसून आले. कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोंदी घेण्यात आल्या.
त्यामुळे गैरहजर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होणार असून. आमदार देवेंद्र भुयार यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून जनतेची कामे व त्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश दिल्यामुळे नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या निर्णयाचे स्वागत केले  तसेच कार्यालयीन कामकाज अधिक जबाबदारी आणि कार्यक्षमपणे करण्याचे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी वरुड येथील तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले.