पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी यांना शौर्य पुरस्कार जाहीर

0
1467

‘ऑपरेशन नक्षल’ या मोहिमेअंतर्गत २०१८ साली गडचिरोली नक्षल प्रभावी भागात ५० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणारे अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी यांना केंद्र गृहमंत्रालयाने राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर केला आहे. त्यामुळे पोलीस विभागात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

 

डॉ. हरी बालाजी यांनी गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागात २ वर्ष ४ महिने आपली सेवा दिली. या दरम्यान त्यांनी ‘ऑपरेशन नक्षल’ हे विशेष अभियान गडचिरोली नक्षलवादी भागात राबविले. या दरम्यान २०१८ साली नक्षलवादी व पोलिसांमध्ये एका घटनेदरम्यान चांगलीच चकमक उडाली यावेळी डॉ. हरी बालाजी यांनी सर्व सूत्र आपल्या हाती घेत घटनास्थळी ५० नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. विशेष म्हणजे या ऑपरेशनच्यावेळी एकही पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला नाही.