ट्रक – कारची समोरासमोर धडक; अमरावतीचे दाम्पत्य ठार

0
29548
Google search engine
Google search engine

दर्यापूर-अकोट मार्गावरील वडणेर गंगाई जवळील रंभापूर फाट्याजवळील घटना

दर्यापूर/अकोट :-

दर्यापूर ते अकोट मार्गावरील वडणेर गंगाइ चा रंभापूर फाट्याजवळ काल सोमवारी रात्री ८ ते ९ वाजताच्या दरम्यान ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारने हिवरखेडला निघालेले अमरावती येथील दांम्पत्य ठार झाले. आनंद सुरेशकुमार कारिया व प्राची आनंद कारिया अशी अपघातात मृत पावलेल्या पती-पत्नीची नावे आहेत.

अकोटहून अमरावतीकडे येणारा ट्रक (क्रं. MH-३४, AB २१४८) व नॅनो कार (क्रं. MH-२७, AC ४७१३) ची रंभापूर फाट्याजवळ समोरासमोर जबर धडक झाली. अकोट ग्रामीणचे ठाणेदार श्री ज्ञानोबा फड यांच्यासह त्यांच्या पथकाने तात्काळ धाव घेतली व कारिया दाम्पत्याला बाहेर काढून त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आनंद कारिया व प्राची कारिया हे दाम्पत्य मूळ हिवरखेडचे असून अमरावतीला वास्तव्यास होते