*प्रहारचे वतीने बँक ऑफ महाराष्ट्र शाखा येवदा येथे ठीय्या आंदोलनाचा ईशारा………….*

0
585

 

 

प्रतिनिधी / दर्यापूर :-
संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्ज माफी झाली असतांना सुध्दा दर्यापुर तालुक्यातील येवदा गावातील शेतकरी कर्ज माफी पासून वंचीत आहेत.निवेदनात असेही नमूद आहे की,
महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना सन २०१९ च्या अनुषंगाने सन २०१५ ते २०१९ पर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना माफी महाराष्ट्र सरकारने घोषित केली होती त्या अनुषंगाने मा, शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा येवदा यांनी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्ज माफी करिता संपूर्ण यादी पाठविणे गरजेचे होते.
परंतु बँक व्यवस्थापकाच्या वेळकाडू धोरणामुळे हलगर्जीपणामुळे अपूर्ण यादी शासन विभागाकडे मंजुरी करिता पाठविण्यात आल्याने येवदा सर्कल परिसरातील शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदिप वडतकर यांनी बँक व्यवस्थापकाला जाब विचारत चांगलेच धारेवर धरले त्यामुळे बँक व्यवस्थापनाने उर्वरित २१५ शेतकऱ्यांची यादी पुन्हा शासन विभागाकडे मंजूरी करिता पाठविण्यास भाग पाडले. बँकेच्या हलगरजी पणामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्या सामोरे जावे लागत आहे. सध्या स्थितीत करोणा आजाराचा प्रादुर्भाव अजूनही कायम असल्याने शेतकरी अडचणी आहे. यावर्षीचे शेतकऱ्यांच्या घरात येणारे मुख्य पीक उडीद,सोयाबीन पावसाच्या अति दृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मुख्य पिकांची माती झाली आहे. सध्या स्थितीत रब्बी पिकाच्या हंगाम संपुष्टात आला आहे. तरी सुध्दा येवदा सर्कल परिसरातील उर्वरित २१५ शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेचा लाभ देण्यात आला नसल्याने येवदा सर्कल परिसरातील शेतकऱ्यांच्या कर्ज मुक्त करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदिप वडतकर यांच्या सह गावातील शेतकरी दि. १७ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १२ वाजता बँक ऑफ महाराष्ट्र शाखा येवदा येथे ठीय्या देऊन आंदोलन करण्याचा ईशारा प्रदिप वडतकर यांनी दिला आहे.तरी गाव परिसरातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने आंदोलनात उपस्थित राहण्याचे आव्हानही प्रहारचे प्रदिप वडतकर यांनी केले आहे…..

insurance loans mortgage