अमरावती ब्रेकिंग :- _ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक_ *सरपंचपद आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर*

0
2835
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 28 : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून, एप्रिल 2020 ते मार्च 2025 या कालावधीत मुदत संपणा-या व नव्याने स्थापित होणा-या जिल्ह्यातील 840 ग्रामपंचायतींसाठी महिला आरक्षणासह विविध प्रवर्गातील सरपंच आरक्षण सोडतीची सर्व कार्यवाही तहसीलदारांनी त्यांच्या स्तरावर करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केले आहेत.

याबाबत नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी उपविभागीय अधिका-यांवर सोपविण्यात आली आहे. कार्यक्रमानुसार, अमरावती तालुका, तिवसा तालुका, चांदूर रेल्वे तालुका, मोर्शी तालुका, दर्यापूर तालुका, चांदूर बाजार तालुका, धारणी तालुका यासाठी 2 फेब्रुवारीला सोडत होईल. त्याचप्रमाणे, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, धामणगाव रेल्वे, वरुड, अंजनगाव सुर्जी, अचलपूर व चिखलदरा या तालुक्यांसाठी 4 फेब्रुवारीला सोडत होईल.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 व मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक अधिनियम 1964 नुसार आरक्षण सोडतीची कार्यवाही व्हावी. एकही चूक किंवा नियमभंग होऊ नये. आरक्षण सोडतीनंतर इतिवृत्त व अहवाल सादर करावा. सोडतीबाबत जाहीर सूचना प्रसिद्ध करावी. आरक्षण कार्यक्रमादरम्यान सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर व मास्कचा वापर आदी दक्षता सूचना कसोशीने पाळाव्यात, असेही निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. नवाल यांनी दिले आहेत.

000insurance loans mortgage