अर्थव्यवस्थेला गती देण्यासारखं या अर्थसंकल्पात काही नाही: आमदार देवेंद्र भुयार 

0
574
Google search engine
Google search engine
अर्थव्यवस्थेला गती देण्यासारखं या अर्थसंकल्पात काही नाही: आमदार देवेंद्र भुयार
देशाचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे. कृषिप्रधान असनाऱ्या या देशात अर्थसंकल्पा मध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहे लघु मध्यम उद्योगांना बळ देण्याची कुठलीच संकल्पना दिसत नाही एकंदरीत केंद्रीय अर्थसंकल्पात घोर निराशा झाली आहे . बजेटमध्ये नवीन काही नाही, नवी बाटली जुनी दारू असे दिसते आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करणार आधी सांगितलेले,पण शेतीचा दर डबल कसे करणार, हे सांगितलेले नाही. १०० स्मार्ट सिटीच काय झालं? सर्वसामान्य नागरिकांना काय सुविधा दिल्या. अर्थव्यवस्था मोडकळीला गेली, शेअर बाजार कोसळला, हे कशाचे धोतक आहे.
रेल्वे खासगीकरण करणार, LIC ,IDBI तसच करणार दिसत आहे. हे कुचकामी बजेट आहे. फसव्या घोषणा करतात, विकासदर कमी, वित्तीय तूट वाढतेय. हे निरशाजनक बजेट असून नवा रोजगार तयार होत नाही,
यावर्षी निराशाजनक आणि गोंधळात टाकणारं बजेट सादर केले आहे, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या बजेटवर आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे. मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा सरळसोट नसून गुतागुंतीचा आहे. रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेची घडी बसवण्याच्या अनुषंगाने हा अर्थसंकल्प सादर होईल, असे वाटले होते. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही, — आमदार देवेंद्र भुयार मोर्शी विधनसभा मतदार संघ .