चांदूर रेल्वे शहरातील घरकुल लाभार्थ्यांनी नितीन गवळींचे मानले आभार – नितीन गवळींची मदत लाभल्याचे लाभर्थ्यांनी सांगितले

0
1135

 

अमरावती – (विशेष प्रतिनिधी)

प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा निधी आल्याने घरकुल लाभार्थ्यांनी आज सोमवारी आम आदमी पार्टीचे नेते नितीन गवळी यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ दिले व आभार व्यक्त केले. आम आदमी पार्टीच्या वतीने निधीसाठी आंदोलन केले होते व यानंतर लाभार्थ्यांना निधी प्राप्त झाला.

प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतील धनादेश प्रलंबित प्रकरणात ५ जानेवारीला चांदूर रेल्वे नगर परिषदेवर आम आदमी पार्टी तर्फे आंदोलन करण्यात आले होते. सदर आंदोलनाची दखल घेऊन लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्य्याचा निधी मिळत आहे. अशातच आज सोमवारी काही घरकुल लाभार्थ्यांनी खुद्द आप नेते नितीन गवळींनी भेट घेऊन पुष्पगुच्छ दिले. व निधी मिळण्यासाठी मदत केल्याबद्दल आभार व्यक्त केले.