अकोला शहर वाहतूक शाखेचा उपक्रम राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे हाथ जोडतो, वाहतुकीचे नियम पाळा पथनाट्य

170

अकोला शहर वाहतूक शाखेचा उपक्रम

अकोलाःरस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी आज अकोला शहरातील चौका मध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर केले, स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय जवळील HDFC चौक, खुले नाट्य गृहा जवळील चांदेकर चौक येथे सदर पथनाट्य सादर करण्यात आले,

सदर पथनाट्य मध्ये वेगाने वाहन चालविणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईल वर बोलणे, चुकीच्या बाजूने वाहन चालविणे, दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान न केल्याने काय दुष्परिणाम होतात ह्या बाबत विद्यार्थ्यांनी पाथनाट्याचे सादरीकरण करून उपस्थित लोकांची रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृती केली, सदर पथनाट्य सादर करण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी पुढाकार घेतला होता

, सदर पाथनाट्य सादर करण्या मध्ये श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे,रासेयो अकोला जिल्हा समन्वयक डॉक्टर संजय तिडके, कार्यक्रम अधिकारी डॉक्टर गणेश खेकाडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली रोहन बुंदेले दिग्दर्शित रस्ता सुरक्षा पथनाट्य मध्ये हर्षल पाटील, अखिलेश अनासने, योगेश राऊत, शुभम जमोदे, माधुरी इंगळे, प्रगती ढोबळे, इशा मेसरे, अभिजित वानखेडे, वैभव चोपडे, अंजली खंडेराव, आम्रपाली दंदी, सचिन काळे, राजश्री इंगळे, वैष्णवी आसेकर ह्यांनी सहभाग नोंदवला

जाहिरात