चांदुर बाजार पोलिसांना अवैध धंदे चे आव्हान तालुक्यातील पोलीस स्टेशन बनले फक्त नावालाच ?

0
968
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार पोलिसांना अवैध धंदे चे आव्हान

तालुक्यातील पोलीस स्टेशन बनले फक्त नावालाच ?

अवैध गौवंश आणि मोटरसायकल चोरी जोरात

 

चांदुर बाजार:-

चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा,ब्राम्हणवाडा थडी,आसेगाव चांदुर बाजार हे पोलीस स्टेशन फक्त नावालाच असल्याची चर्चा आता चांदुर बाजार तालुक्यात जोर धरत आहे.तर फक्त आलेली तक्रार नोंदविण्याचे काम केले जात असून तपास आणि जुने गुन्हे कधी निकाली काढणार असा प्रश्न आहे. तर तालुक्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक च्या कार्यवाही सुरू असून चार पोलीस स्टेशन मधील अधिकारी आणि कर्मचारी फक्त नावालाच असून इमारत शोभेची वास्तू असल्याचे चित्र आहे.

चांदुर बाजार तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरातून गौवंश तसेच मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले असून ब्राम्हणवाडा थडी,शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीत देखील तीच परिस्थिती आहे.मात्र यावर केवळ गुन्हा दाखल करून तो डायरी मध्ये नोंदविला जातो. त्याच्या आरोपी पर्यत पोहचण्यासाठी पोलीस का प्रयत्न करीत नाही आहे हा प्रश्न आहे.चार पोलीस मध्ये 17 अधिकारी आहे मात्र त्याच्या कार्यवाही पाहिजे त्या प्रमाणात नाही.त्यामुळे या कार्यप्रणाली कडे वरिष्ठ यांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे.

आसेगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू,गुटखा,गौवंश वाहतूक यांची एक कार्यवाही पोलीस का करीत नाही हा प्रश्न आहे.तर चांदुर बाजार मधील पळवून नेलेली गौवंश पैकी एकही पोलिसांना शोधता आला नाही.त्या व्यतिरिक्त अवैध गुटखा,अवैध दारू,जुगार,अवैध वाळू,वरली मटका सारखे अनेक व्यवसाय चांदुर बाजार शिरजगाव कसबा ,आणि ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन हद्दीत जोमाने सुरू आहे.या ठिकाणी पोलीस कार्यवाही का करत नाही आहे.हे आव्हान पोलीस याच्या समोर आहे.

शिरजगाव कसबा पोलिस स्टेशन हद्दीत देउरवाड़ा करजगाव, शिरजगाव कसबा,कुऱ्हा या ठिकाणी अवैध गुटख्या ,अवैध वाळू बरोबर गावठी दारूचे व्यवसाय जोरात सुरू आहे.तर ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन हद्दीतून अवैध गौवंश वाहतूक, घटलाडकी परिसरात वरली मटका,विषरोळी भागात अवैध वाळू तस्करी आणि ब्राम्हणवाडा थडी या ठिकाणी वरली मटका,अवैध देशी दारूचे,जुगार चे मोठे रॅकेट असून देखील पोलिस गप्प का असा प्रश्न निर्माण होत आहे.तर एक प्रकारचे हे पोलीस विभागला आव्हानच म्हणावे लागेल.