चांदूर रेल्वे शिवसेनेचे कार्यकर्ते टांग्याने पोहचले थेट एसडीओ कार्यालयावर – पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध

0
538
Google search engine
Google search engine

 

*चांदूर रेल्वे – प्रतिनीधी*

मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या दरावाढीचा आज शुक्रवारी दुपारी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात शिवसेनेने एसडीओ कार्यालयावर टांग्याने जाऊन निषेध नोंदविला. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख श्याम देशमुख यांनी केले. यानंतर एसडीओंना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी केंद्रसरकार विरोधात नारेबाजी सुध्दा करण्यात आली.