अमरावती ब्रेकिंग :- महावितरण (MSEDCL) चे कार्यकारी अभियंता ACB च्या जाळ्यात – अकरा हजाराची स्वीकारली लाच

0
7053
Google search engine
Google search engine

आदरणीय महोदय,
▶️ यशस्वी सापळा कारवाई
▶️घटक – अमरावती
▶️तक्रारदार – पुरूष, वय 43 वर्ष, व्यवसाय – शासकीय इलेक्ट्रिकल कंत्राटदार रा. वरूड जि. अमरावती
▶️ आ.लो.से – श्री.धर्मेंद्र मुगुटराव मानकर,वय 55 वर्ष,पद – कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.मोर्शी विभाग ता. मोर्शी जि.अमरावती.वर्ग -1.
▶️लाच मागणी रक्कम – 11,000/- रूपये
➡ लाच स्विकारली रक्कम – 11,000/- रुपये
▶️पडताळणी- दि.08/02/2021 व दि.09/02/2021.
▶️ यशस्वी सापळा कारवाई दि.- 10/02/2021.
▶️घटनास्थळ- आलोसे श्री.मानकर, कार्यकारी अभियंता,(MSEDCL) यांचे कॅबिनमधे
▶️कारण – तक्रारदार हे शासकीय इलेक्ट्रिकल कंत्राटदार असुन आ.लो.से.श्री.मानकर, कार्यकारी अभियंता यांनी तक्रारदार यांना एन.एस.सी इनफ्रा स्कीम अंतर्गतचे बारगाव, जरुड, पेठ मंगरुळी गावामध्ये केलेल्या कामाचे देयकावर सही करुन नेहमीप्रमाणे एकुण बिलाचे 1 टक्क्याने 6,000/- रुपये व घोडदेव गावातील पोल्ट्री फार्मचे कनेक्शनचे अंदाजपत्रक मंजूर करुन दिल्याबद्दल 5,000/- रुपये असे एकुण 11,000/- रूपये पडताळणी दरम्यान लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले.वरुन आज रोजी सापळा कारवाई आयोजीत केली असता आलोसे श्री.मानकर यांनी त्यांचे कार्यालयाचे कॅबिन मध्ये तक्रारदार यांचेकडून 11,000/- रुपये लाच रक्कम स्विकारली.आरोपी लोकसेवक श्री. मानकर यांना ताब्यात घेण्यात आले असून कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 (26 जुलै 2018 चे सुधारणा) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶️ आ.लो.से. यांचे सक्षम अधिकारी – मा.मुख्य महाव्यवस्थापक,( तांत्रिक/आस्थापना ) मुख्य कार्यालय, प्रकाशगड,मुंबई.
मार्गदर्शन –
▶️मा. श्री. विशाल वि.गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती
मा. श्री. अरुण सावंत, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती,मा.श्री.गजानन पडघन, पोलिस उपअधीक्षक, ला.प्र.वी.अमरावती.
▶️ सापळा कारवाई पथक-श्री. राहुल वसंतराव तसरे ,पोलीस निरीक्षक ला. प्र.वि. अमरावती, स्टाफ NPC विनोद कुंजाम , युवराज राठोड, PC सुनिल जायभाये, पंकज बोरसे,वाहन चालक सतीश किटूकले. सर्व ला.प्र.वि.अमरावती.
▶️तपासी अधिकारी :- श्री.राहुल वसंतराव तसरे ,पोलीस निरीक्षक ला. प्र.वि. अमरावती

▶️हैश वैल्यु घेण्यात आली आहे.
—————————————-
*सर्व नागरीकांना आवाहन*
*करण्यात येते की, कोणत्याही* *शासकीय अधिकारी/कर्मचारी
यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी* *केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती.
*दुरध्वनी क्रं 07252 235933
*@टोल फ्रि क्रं 1064*
——————————