कोरोना काळामध्ये सेवा देणाऱ्या आशा वर्कर कोरोना योद्धा — आमदार देवेंद्र भुयार आमदार देवेन्द्र भुयार यांच्या उपस्थितीत वरुड येथे आशा दिवस संपन्न ! 

0
714
Google search engine
Google search engine
आमदार देवेन्द्र भुयार यांच्या उपस्थितीत वरुड येथे आशा दिवस संपन्न !
कोरोना काळामध्ये सेवा देणाऱ्या आशा वर्कर कोरोना योद्धा — आमदार देवेंद्र भुयार
आशा दिवस’ निमित्त आशा सेविकांच्या समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन  !
वरुड तालुका प्रतिनिधी:
       कोरोना  काळात लॉकडाउन मध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ज्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका घरोघरी फिरल्या त्याच खरोखर कोरोना योद्धा आहेत शासनाच्या आरोग्यविषयक प्रत्येक योजनांची माहिती व लाभ आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचविणाऱ्या तसेच गरोदर मातेची वेळोवेळी आरोग्य तपासणी व नवजात शिशुचे संगोपन नियमित करण्याचे पुण्यकार्य आशा वर्कर वर्षाचे 365 ही दिवस अव्याहतपणे करीत असून अत्यंत कमी मोबदल्यावर काम करणाऱ्या या आशा सेविकांचे करावे तेवढे कौतुक कमी असून आशा वर्कर ने उत्तमरीत्या काम करून नवजात बालक व माता मृत्यूच्या दरामध्ये घट केला असल्याचे मौलिक प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी आशा दिवस कार्यक्रमात व्यक्त केले.
वरुड तालुका पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने  आशा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सकाळपासूनच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्यासह शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जनते पर्यंत पोहचविण्याचे काम करणार्या आशा व गटप्रवर्तकांना प्रोत्साहन देण्यासाठी वरुड येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी  आशासेविका करत असलेल्या कार्याचे अभिनंदन करत मानधन, विमा ई. समस्या लवकर सोडवन्याचे आश्वासन दिले.
वरुड येथे झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागातर्फे आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते आशा सेविकांना मार्गदर्शन करण्यात आले व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय सेवा देत असलेले विश्वकृपा आयुर्वेदालयाचे डॉ.चरण सोनारे यांचा सत्कार करण्यात आला .
 यावेळी कार्यक्रमाला आमदार देवेन्द्र भुयार, प.स.सभापती विक्रम ठाकरे,जी.प. सदस्य राजेंद्र बहुरूपी, जी.प.सदस्य सीमाताई सोरगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अमोल देशमुख, वैदकीय अधीक्षक डॉ.प्रमोद पोतदार. प.स.सदस्य शिल्पाताई पोवार, प.स. सदस्य अंजलीताई तुमडाम यांच्यासह आदी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.