*दहावी- बारावी वगळता इतर वर्ग २८ पर्यंत बंद*

0
3124
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. १२ : अमरावती जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावामुळे दहावी व बारावी वगळून इतर वर्ग दि. २८ फेब्रुवारी आधी सुरू करता येणार नाहीत, असे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिका क्षेत्रातही तसा आदेश पालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी जारी केला आहे. जे शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांच्या संपर्कातील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या चाचण्या करून घेण्याबाबतही आदेशित करण्यात आले आहे.
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परिक्षेच्या तयारीसाठी अध्यापन करण्यात यावे मात्र, कोरोना प्रतिबंधक उपायांचे काटेकोर पालन करावे, त्याचप्रमाणे, इतर वर्गांच्या विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी ऑनलाईन साधनांचा वापर करावा, असे आदेशित करण्यात आले आहे.
०००