संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने घ्यावा.- संभाजी ब्रिगेड Aisf ची मागणी

0
435
Google search engine
Google search engine

अमरावती:-

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ १५/०२/२०२१ रोजी आयोजित केला आहे, परंतु सध्या अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता माननीय जिल्हाधिकारी यांनी १२/०२/२०२१ रोजी काढलेल्या आपत्ती व्यवस्थापन व साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार अमरावती शहर व ग्रामीण भागाकरिता संचार बंदी व जमावबंदीचे आदेश दिनांक २८/०२/२०२१ पर्यंत पारित केले आहेत अशा परिस्थितीत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २१/०२/२०२१ ला ऑफलाईन आयोजित करण्यात आल्याने त्याचे परिणाम अमरावती जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण अमरावती विभागात कोरोणाचा उद्रेक होऊ शकतो कारण संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थी सदर पदवीदान समारंभ करता अमरावती येथे हजर राहतील म्हणून संभाजी ब्रिगेड व Aisf च्या वतीने मा. रहिवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांना निवेदनाच्या माध्यमातून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विनंती करण्यात आली की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ सुद्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे आदेश विनाविलंब काढण्यात यावे आणि जर असे होत नसेल तर कोरोणा काळात सभा बंदी, मिरवणूक बंदी, संचारबंदी, जमावबंदी यासारखे आदेश फक्त सामान्य जनते पुरतेच आहेत का? श्रीमंतांसाठी किंवा उच्चपदस्थ, राजकीय नेते या लोकांसाठी नाहीत? असा आम्हाला अर्थ घ्यावा लागेल., यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शुभम शेरकर, AISF जिल्हा सचिव योगेश चव्हाण, नेशन फस्ट आंदोलनाचे मयूर राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.