पणज महसूल मंडळात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला

62

काही ठीकाणी गारांचा पाऊस

अकोटः तालुक्यातील पणज परिसरात बुधवारी व गुरुवारच्या दुपारी विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे पणज बोचरा शहापूर नर्सिंगपूर वाघोडा अकोली जहागीर दीवठाना रुइखेड शेतशिवरात वाऱ्यासह पाऊस पडल्याने केळी हरभरा गहू संत्रा व इतर पिकांचे नुकसान होऊन शेतकरी पुन्हा आस्मानी संकटात सापडला

यावर्षी वारंवार पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान होत आहे याधीही सोयाबीन तूर मूग ज्वारी कपाशी पिकांचे नुकसान झाले होते गुरवारी झालेल्या वाऱ्यासह पावसाने केळीच्या बागेचे पाने फाटले तर काही ठिकाणी गारांचा मार लागला किशोर अकोटकर यांच्या शेतातील १ एकर मिरची पिकाचे नुकसान झाले आहे तसेच गहू पूर्णतः झोपला आहे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत

जाहिरात