मध्यस्थी परिचय पुस्तिकेच्या ९ वार्षिकांकाचे प्रकाशन संपन्न

173

आकोटःसंतोष विणके

संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेअंतर्गत गठीत मध्यस्थी मंडळाच्या वधू-वर परिचय पुस्तिकेच्या ९व्या वार्षिकांकाचे प्रकाशन पार पडले.
श्रद्धासागर येथे संपन्न झालेल्या प्रकाशन समारंभाचे अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब फोकमारे होते.संस्थेचे विश्वस्थ पुरुषोत्तम लाजुरकर यांचे हस्ते प्रकाशन पार पडले यावेळी संस्थेचे सहसचिव अवि गावंडे, विश्वस्थ महादेवराव ठाकरे,अशोकराव पाचडे संत पीठावर उपस्थित होते.

मध्यस्थी मंडळाचे सचिव सुरेशदादा कराळे यांनी प्रास्ताविकात मंडळाचे कार्याचा आढावा सादर केला.तर संस्थेचे विश्वस्त तथा या परिचय पुस्तिकेकेचे मुख्य संपादक नंदकिशोर हिंगणकर यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले.
यावेळी परिचय पुस्तिकेचे मुद्रक यश काॕम्प्युटरचे संचालक राहुल जायले व सहाय्यक शुभम् चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.शेवटी मंडळाचे कोषाध्यक्ष जयकृष्ण वाकोडे यांनी सर्वाचे आभार मानलेत.

कोविड-१९चे प्रतिबंधात्मक नियम पाळून अगदी छोटेखानी कार्यक्रम पार पडला यावेळी मंडळाचे सदस्य महादेवराव सावरकर, नागोराव कुलट,मधुकरराव पुंडकर,नागोराव वानखडे,वृंदाताई मंगळे,रामदास मंगळे,गणेश पांडे,संस्थेचे व्यवस्थापक अमोल मानकर मंडळाचे कार्यालयीन व्यवस्थापक महादेवराव बोरोकार आदी उपस्थित होते.

विवाह योग सुलभतेने जुळावेत यासाठी मध्यस्थी मंडळ कार्यरत आहे. .राज्यभरातून आलेल्या सर्वस्तरातील विवाहयोग्य युवक युवतींचा संक्षिप्त परिचय असलेल्या या पुस्तिकेला राज्यभरातून पालकांची मोठी मागणी आहे.

जाहिरात