तुरखेड येथे रक्तदान करुन शिवजयंती साजरी

0
552
Google search engine
Google search engine

आकोटःग्राम तुरखेड येथे रक्तदान करुन शिवजयंती अनोख्या पद्धतीने विधायक व सामाजिक उपक्रम आखत साजरी करण्यात आली. दि.19 -02- 2021 रोजी शिवजयंतीनिमित्त गरजुचे रक्तदाते ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने गाव तुरखेड तालुका अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले गरजुचे रक्तदाते ग्रुप महाराष्ट्र राज्य हा ग्रुप गरजू व गरीब रुग्णांसाठी 24 तास तत्पर असतो व गरजू व गरीब रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करण्यासाठी सतत झटत असतो व गेल्या काही वर्षांपासून गरजुचे रक्तदाते ग्रुप महाराष्ट्र राज्य हा ग्रुप रक्तदान चळवळीमध्ये सिंहाचा वाटा देत व जवळपास 281 गरजू रुग्णांना मोफत रक्तदान केले आहे व या रक्तदान शिबिरा करिता ग्रुपचे संस्थापक अमित गजाननराव वरणकार हे वेळोवेळी ज्या रक्तदात्यांचे गरजेच्या वेळी शेती मुळे व इतर काही कारणांनी रक्तदान करण्याकरिता येऊ शकत नाही त्यासाठी ग्रामीण भागात रक्तदान शिबीराचे आयोजन करत असतात. आजच्या शिबिरासाठी अमरावती उपतालुका-अध्यक्ष अक्षय मानकर,तालुका-अध्यक्ष ऋत्विक काकड,युवती ग्रामीण जिल्हा अध्यक्षा अंकिता ताई देवबाले, अंजनगाव तालुका-अध्यक्ष दर्शन चोपडे व सो.मीडिया.अध्यक्ष आदित्य ठाकरे तुरखेड गावातील समस्त गावकरी मंडळी ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमातच नेहमी अमरावती शाखे सोबत काम व रुग्णसेवा करणारे रितेश खऊल यांची दर्यापूर ता उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली..

सदर कार्यक्रम हा सोशल डिस्टंसिंग चे पालन करून पार पाडण्यात आला.