बार्टी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

70

कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.

आकोटःडॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,पुणे अंतर्गत कार्यरत समतादूत प्रकल्प जिल्हा अकोला च्या वतीने आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अकोट येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून न्यायमूर्ती मा.सत्यदेव पी. बेदरकर,विधिज्ञ श्री.मनोज वर्मा सर,समतादूत प्रकल्प जिल्हा प्रकल्प अधिकारी विजय पी.बेदरकर,मा.केंद्र प्रमुख अंदूरकर सर,मा.मुख्याध्यापक धांडे गुरुजी,प्रा.श्री.संजय अरबट सर,प्रा.श्री.विनोद सपकाळ सर,एस. टी.महामंडळ चे लिपिक श्री.देवेंद्र गवळी साहेब,विदर्भ कोकण ग्रामीण बँक चे अरविंद अष्टोकार,ज्योशिबा फाउंडेशन च्या सौ.वनमाला पी.बेदरकर ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.यावेळी प्रमुख मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तद्नंतर विजय बेदरकर प्रकल्प अधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकत आपले अभिवादनपर प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी बार्टीच्या विविध उपक्रमांची व सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती उपस्थितांना दिली.यावेळी उपस्थितांमध्ये वैभव वनकर,सुरेश मालठाणकर,विजय चंदन,आदित्य बेदरकर,वानरे साहेब,संतोष हिरपूरकर यांची उपस्थिती होती.
अकोला जिल्हात कोरोना प्रादुर्भाव फैलाव जास्त प्रमाणात वाढत असल्याने हा कार्यक्रम छोटेखानी आयोजित करण्यात आला होता.यावेळी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून सामाजिक अंतर ठेवून सॅनिटायझर चा वापर करण्यात आला होता.समतादूत प्रकल्प बार्टी,पुणे जिल्हा अकोला च्या वतीने जिल्हातील तालुका कार्यक्षेत्रात कार्य करणारे सर्व समतादूत त्यामध्ये समतादूत ऍड.वैशाली गवई,रविना सोनकुसरे (अकोला तालुका),मनेश चोटमल,स्मिता राऊत (मूर्तिजापूर तालुका),प्रज्ञा खंडारे (बाळापूर तालुका),उपेंद्र गावंडे,विनोद सिरसाट (बार्शीटाकळी तालुका),समता तायडे (पातूर तालुका),शुभांगी लव्हाळे (तेल्हारा तालुका) यांनी आपल्या तालुका कार्यक्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता कमी उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम आयोजित केले होते.यावेळी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते.

जाहिरात