वाढत्या करोना प्रादुर्भावाचे पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखा एक्शन मोड वर

383

जप्त केलेल्या वाहनांनी वाहतूक शाखा कार्यालय तुडुंब भरले

अकोलाःप्रतिनिधी

जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसा पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता आहे, दररोज १०० ते १५० चे आसपास कोरोनाचे रुग्ण निघत आहेत, ह्या साठी जिल्हा प्रशासनाने वारंवार आवाहने केली आहेत, मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर कायम ठेवण्याच्या प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद न मिळाल्या मुळे जिल्हाधिकारी ह्यांनी वाहनांच्या बाबतीत काही निर्देश पारित केले त्या मध्ये ऑटो मध्ये चालक व दोन सवाऱ्या तसेच इतर प्रवासी वाहन जसे मॅक्सिमो, कालिपिली ह्या प्रवासी वाहनात चालकां शिवाय 3 प्रवासी ह्यांनाच परवानगी देण्यात आली आहे,

ह्या निर्देशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांनी देताच शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी आपल्या पोलीस अमलदारासह धडक कारवाई करून एका दिवसात जवळपास 80 वाहने जप्त करून शहर वाहतूक कार्यालयात लावण्यात आली,

जप्त केलेल्या वाहना मुळे वाहतूक कार्यालय तुडुंब भरले असून ह्या वाहन चालकांवर गुन्हे दाखल करून त्यांची वाहने जप्त करण्यात आली असून कोर्टाच्या आदेशा शिवाय सोडण्यात येणार नसल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले असून वाहन चालकांनी प्रशासनाने दिलेल्या निर्देशा चे पालन करूनच आपली वाहने चालवावी अन्यथा त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करून वाहने जप्त करण्यात येतील असा इशारा दिला आहे,

सदर मोहिमे दरम्यान ऑटो,ऐपे, मॅक्सिमो, कालिपिली ही प्रवासी वाहने व ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या मोटारसायकल चा समावेश आहे, सदर ची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे निर्देशा प्रमाणे, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ व शहर वाहतूक शाखेच्या पोलीस अमलदारांनी केली

जाहिरात