राज्यातील न.प. कर्मचाऱ्यांचे १ मार्चला ढोल बजाव भीक मांगो आंदोलन

342

 

आकोटःराज्यातील नगरपरिषदा नगरपंचायती मधील कर्मचाऱ्यांना वेतनासाठी दरमहा एक तारखेला अनुदान मिळत नाही तसेच 2019 मधील जानेवारी ते ऑक्टोबर पर्यंतचे थकीत सहाय्यक अनुदान सुद्धा अद्याप दिलेले नाही. सातवा वेतन आयोगाची थकबाकी सुद्धा प्रलंबित आहे. या आर्थिक विवंचनेमुळे सफाई कामगार व कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांना दोन महिन्याचे वेतन मिळत नसल्याने उपासमार होत आहे व दर महिन्याला कर्मचाऱ्यांना पगाराची भीक मागावी लागत आहे. शासनाने कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाचे निषेधार्थ शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांचे 1 मार्च रोजी *ढोल बजाव भीक मांगो* आंदोलन करण्याचे ठरवले आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत, संवर्ग कर्मचारी संघटनेने दिनांक 15 फेब्रुवारी रोजी राज्याचे नगर विकास विभागाचे प्रधान सचिव मा. श्री महेश जी पाठक यांना निवेदन दिले.
मा. ना. श्री उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री, मा. ना. एकनाथजी शिंदे नगर विकास मंत्री, मा. ना. प्राजक्त दादा तनपुरे राज्यमंत्री नगर विकास विभाग, डॉ. किरण कुलकर्णी आयुक्त तथा संचालक नगर पालिका संचालनालय मुंबई यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आलेल्या आहेत. राज्यातील नगरपरिषद कर्मचारी, सफाई कामगार व पाणीपुरवठा कर्मचारी व इतर कर्मचारी यांना कार्यालयीन कामासोबतच कोव्हीड 19 सारख्या आजारात रात्रंदिवस काम करीत आहेत परंतु याच कर्मचाऱ्यांना पगार करिता शासनाकडे भीक मागावी लागत आहे. कर्मचाऱ्यांचे विविध मागण्या संदर्भात मा. आयुक्त तथा संचालक कार्यालयाकडे अनेक प्रश्न प्रलंबित असून या कार्यालयामार्फत गेल्या दोन वर्षापासून फक्त कागदी घोडे नाचवले जात असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात शासन जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना नाईलाजास्तव 1 मार्च रोजी जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायती समोर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ढोल बजाव भिक मांगो आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे तसेच 1 मार्चनंतर ही शासनाने राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे संदर्भात दुर्लक्ष केल्यास नाइलाजास्तव 15 एप्रिल रोजी पासून अत्यावश्यक सेवेसह सर्व कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करतील असे राज्याचे राज्याध्यक्ष विश्वनाथ घुगे, उपाध्यक्ष धर्माजी खिल्लारे दीपक रोडे राज्य सचिव गजानन इंगळे सरचिटणीस रामेश्वर वाघमारे राष्ट्रीय अध्यक्ष चरण सिंग टाक प्रदेशाध्यक्ष जयसिंग कछवाल कार्याध्यक्ष अनुप खरारे, महामंत्री दिलीप अण्णा चांगरे, पी बी भातकुले, चंद्रकांत चव्हाण जिल्हाध्यक्ष शांताराम निंधाने, प्रदेश उपाध्यक्ष श्याम पीवाल तेल्हारा, मदन खोडे पातुर, मनोज चावरिया बाळापूर, राजा सारवान, राजुशेठ मुर्तीजापुर, राधेशाम मर्दाने लक्ष्मी नारायण महतो अकोट, तसेच महाराष्ट्र राज्य कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रावणकर उपाध्यक्ष प्रवीण शर्मा, रमेश गिरी, सचिव दीपक सुरवाडे शाखाध्यक्ष ईश्वरदास पवार अकोट, भरत मलीये, तेल्हारा नागोराव सुरजुसे बाळापुर, शिरिष गांधी मुर्तीजापुर, नबी खान पातुर, रुपेश पिंजरकर बार्शिटाकळी यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील नगर परिषद कर्मचारी सफाई कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करतील असे पत्रकात कळवले आहे.

जाहिरात