*भारतीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मास्क चे वाटप*

0
552
Google search engine
Google search engine

अमरावती प्रतिनिधी : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित भारतीय विद्या मंदिर अमरावती द्वारा संचालित भारतीय महाविद्यालय अमरावती येथे राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीने माझे कुटुंब माझे महाविद्यालय या संकल्पने अंतर्गत मास वाटप करण्यात आले .
शहरांमध्ये वाढत्या कोरोनाच्या महामारी मुळे रुग्णांची संख्या दुसऱ्या टप्प्यात दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच अनुषंगाने महाविद्यालय शिकवणी बंद असतांना विद्यापीठांचे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आराधना वैद्य यांच्या नेतृत्वात मास वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.आराधना वैद्य म्हणाल्या की, प्रत्येकाने स्वतःचे सुरक्षितता बाळगण्यासाठी मासचा वापर करणे अनिवार्य आहेत. त्यापेक्षा कोरोनाच्या काळामध्ये मोठी सुरक्षितता कोणतीही असू शकत नाही असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सल्लागार मंडळाचे सदस्य डॉ.अनिल खांडेकर म्हणाले, विद्यार्थी स्वतःची सुरक्षित असेल तर महाविद्यालयाची सुरक्षित राहील, पर्यायाने शहराची सुरक्षित राहील असे प्रतिपादन केले.
या मास वाटपाच्या कार्यक्रमासाठी
डॉ. अलका गायकवाड, डॉ. संगीता देशमुख, डॉ.संगीता कुलकर्णी , डॉ.संग्राम रघुवंशी डॉ.सुमेध आहाटे, डॉ. विजय भांगे डॉ.विनोद कल्यामवार, प्रा.नीलेश कडू जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना डॉ.शर्मिष्ठा कुलकर्णी ,डॉ दया पांडे, प्रा.गायत्री चवाडे डॉ.भार्गवी चिंचमलातपुरे डॉ. विक्रांत वानखडे, डॉ.मंगला भाटे प्रा. पंडित काळे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.
* मास वाटपाचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. ऋषभ डहाके ,डॉ. सुमेध वरघट, प्रा. स्नेहा जोशी महिला कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना, डॉ.पल्लवी सिंग डॉ.प्रशांत विघे कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा,सर्वेश पिंप्राळे
धीरज गाडगे ,अभिषेक गुल्हाने, कुणाल कंठाळे, कमलेश कुशवाह, वैष्णवी दातीर राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थिनी ऋषिकेश कोईचाडे प्रतिनिधी विद्यार्थी प्रतिनिधी, कु.तोमेश्वरी पातालबंशी, पवन वैद्य, ,अक्षय गुल्हाने,नीरज जसुतकर, आकांक्षा बुटले ज्ञानेश्वरी वानखडे,साक्षी पाटील, रुचिता शेजव, कु.तोमश्र्वरी पातालबन्सी, महेश बुधे आदी कर्मचारी वृंद शारीरिक अंतर ठेवून निवडक राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी कार्यक्रमांमध्ये सहभाग दर्शविला.
या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल डॉ. प्रशांत विघे & प्रा.स्नेहा जोशी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.