विश्व वारकरी सेनेच्या संस्थापक अध्यक्षपदी ह.भ.प.गणेश महाराज शेटे यांची निवड

178

आकोटः

विश्व वारकरी सेनेचे ह.भ.प.श्री अरुण महाराज बुरघाटे यांनी स्व इच्छेने त्यांच्या स्व:हाच्या जागेवर अर्थातच ह.भ.प.गणेश महाराज शेटे यांची नियुक्ती विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष या पदावर करण्यात आली असून त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

वारकरी संप्रदायामध्ये अनेक वर्ष आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन करत आले आहेत याचिच दखल घेत माजी अध्यक्ष अरूण महाराज बुरघाटे यांनी मा. ह.भ.प.गणेश महाराज शेटे यांची विश्व वारकरी सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून गणेश महाराज शेटे हे येणाऱ्या काळात अख्ख्या महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील वारकरी बंधूंना सोबत घेऊन काम करतील व त्यांच्या अडीअडचणी सोडतील असा विश्वास विश्व वारकरी सेनेचे माजी संस्थापक अध्यक्ष अरुण महाराज बुरघाटे यांनी व्यक्त केला

विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरूण महाराज बुरघाटे यांनी माझ्यावर जी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे ती जबाबदारी योग्यरित्या पार पाडेल तसेच वारकरी संप्रदायामधील वारक-यांचे भविष्यातील अडचणी सर्व घटकातील वारक-यांना सोबत घेऊन सोडणार तसेच बुरघाटे महाराज यांनी मला जी संधी दीली त्याबद्दल मी बुरघाटे महाराजांचा सदैव ऋणी राहील गणेश महाराज शेटे यांनी सांगितले.

जाहिरात