अकोल्यात लॉक डाऊन च्या निर्देशाचा भंग करणाऱ्या जवळपास १५०  वाहनांवर गुन्हे दाखल,शहर वाहतुक शाखेची कडक कारवाई

226

अकोला शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने काही निर्देश जारी केले आहेत, त्या प्रमाणे तीन चाकी वाहनात चालक अधिक दोन प्रवासी व चारचाकी वाहनात चालक अधिक तीन प्रवासी ह्यांना प्रवास करण्यास परवानगी असून दुचाकी वर फक्त दोन लोकांना हेल्मेट व मास्क सह प्रवास करण्यास परवानगी आहे,

ह्या निर्देशाचा भंग करणाऱ्या वाहनचालकां विरुद्ध धडक कारवाई शहर वाहतूक शाखेने सुरू केली असून 4 दिवसात जवळपास दीडशे वाहन चालकांवर गुन्हे व दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत, पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे निर्देशा नुसार दिलेल्या निर्देशाचा भंग करणाऱ्या वाहन चालकविरुद्ध कारवाईची धडक मोहीम सुरूच राहणार असल्याने वाहन चालकांनी विनाकारण बाहेर फिरू नये व आपली वाहने बाहेर काढताना प्रशासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे

अन्यथा शहर वाहतूक शाखा अश्या वाहन चालकांवर दंडात्मक व गुन्हे दाखल करण्याची कारवाई करेल असा इशारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी दिला आहे।

जाहिरात