निवृत्तीवेतन धारकांचे फेब्रुवारीच्या निवृत्तीवेतनास विलंब होण्याची शक्यता संबंधितांनी नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन

0
1698
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 24 : अमरावती कोषागारातू निवृत्तीवेतन स्विकारत असलेल्या राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना सूचित करण्यात येते की, माहे फेब्रुवारी 2021 चे देय होणारे मासिक निवृत्तीवेतन आयकर अधिनियमानुसार गणना करुन नविन किंवा जुन्या विकल्पानुसार आयकरची कपात करणे आवश्यक आहे.

ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तसेच कोविड-19 आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता माहे फेब्रुवारी चे निवृत्तीवेतन, कुटूंबनिवृत्तीवेतन विभागाव्दारे अदा करण्यास विलंब होऊ शकतो. कृपया संबंधितांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.