कोरोना प्रतिबंधक उपाययोजना पचमढीचा ‘महादेव मेळा’ही स्थगित

0
1176
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 27 : मध्यप्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील पचमढी येथील ‘महादेव मेळा’ही कोरोना प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आला आहे. होशंगाबादचे अतिरिक्त जिल्हाधिकारी जी. पी. माळी यांनी तसे आदेश काढले आहेत.

पचमढीला 3 ते 12 मार्चदरम्यान हा मेळा आयोजित करण्यात आला होता. त्यात मध्यप्रदेशातील भाविकांबरोबरच महाराष्ट्रातून अमरावती, नागपूर, वर्धा, पुणे, जळगाव, अकोला आदी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने भाविक येत असतात. तथापि, वाढते कोरोना संक्रमण पाहता गर्दी टाळण्यासाठी हा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन भाविकांनी घरीच पूजन करून सुरक्षितता जोपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.