विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांची अंजनगाव सुर्जी, दर्यापूरला भेट

0
1400
Google search engine
Google search engine

सजग राहून कामे करा

–         विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांचे यंत्रणांना निर्देश

अमरावती, दि. 2 : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अंजनगाव सुर्जी शहर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी सर्व नियमांचे पालन होण्यासाठी आरोग्य, पोलीस, नगरपालिका यंत्रणांनी सजग राहून कामे करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त श्री. सिंह व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज अंजनगाव सुर्जी येथील कंटेनमेंट झोनला, तसेच दर्यापूर शहराला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. तहसीलदार वैशाख वाहुरवाघ, मुख्याधिकारी गीता वंजारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विभागीय आयुक्त व जिल्हाधिका-यांनी अंजनगाव सुर्जी येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांना डॉक्टर, पारिचारिका यांच्यासह रूग्णांशीही संवाद साधला. त्याचप्रमाणे, त्यांनी

खीरगव्हाणला भेट देऊन तेथील ग्रामपंचायतीने केलेल्या वृक्षलागवड व वृक्षजोपासना पाहून गावकरी बांधवांचे अभिनंदन केले. येथील उपक्रमासाठी व्यायामशाळेसाठी अनुदान देण्यात येईल, असेही जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले.

            सामाजिक वनीकरणाची सोनगाव येथील साईट व सैंधापूर ते पिंपळगव्हाण रस्त्याची पाहणीही त्यांनी केली.  पांदणरस्त्यांना चालना देण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.

                                                दर्यापूरातही पाहणी

विभागीय आयुक्त श्री. सिंह, जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दर्यापूर दर्यापूरला ग्रामीण रूग्णालयालाही भेट देऊन पाहणी दिली. बाधित क्षेत्रात तपासण्यांची संख्या वाढवा. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या. गृह विलगीकरणातील व्यक्तींकडून नियम काटेकोरपणे पाळले जातील यासाठी देखरेख ठेवा, असे निर्देश त्यांनी दिले. दर्यापूरचे तहसीलदार योगेश देशमुख, गटविकास अधिकारी मनीष रायबोले, नप अधिक्षक राहूल देशमुख, पोलीस निरीक्षक नरेंद्र आत्राम यांच्यासह तालुका आरोग्य यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.