अमरावती जिल्हा ब्रेकिंग :- कोरोना प्रतिबंधक कारवाई ; या मंगल कार्यालयाला पन्नास हजारांचा दंड

0
3172

अमरावती, दि. 2 : लग्नसमारंभाचे विनापरवानगी आयोजन व अधिक संख्येत उपस्थिती आढळून आल्याने वलगावातील ‘रिचा मंगलम’ या मंगल कार्यालयचालकाला पन्नास हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या निर्देशानुसार अमरावती तहसीलदार संतोष काकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत संचारबंदी लागू असून, लग्नसमारंभासाठी वधु-वरासह 25 व्यक्तींना उपस्थितीची परवानगी आहे.

वलगाव येथील रिचा मंगलम या मंगल कार्यालयात लग्नसमारंभाचे विनापरवानगी आयोजन केल्याची माहिती मिळताच तहसीलदार पथकाने त्याठिकाणी दाखल होऊन तपासणी केली. यावेळी लग्नसमारंभात 75 ते 80 व्यक्ती उपस्थित असल्याचे आढळून आले. त्यामुळे भारतीय दंडसंहितेच्या कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, कार्यालयाचे व्यवस्थापक शंकरराव गुल्हाने यांना वलगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पन्नास हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.

तहसीलदार श्री. काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार जी. जी. कडू, वलगाव पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष वाकोडे, श्रीकांत लोखंडे, मंडळ अधिकारी एम. व्ही. साव, भूषण तसरे यांच्यासह ग्रामपंचायतीच्या अधिकारी- कर्मचा-यांचा पथकात समावेश होता.