पीच्याक सिल्याट च्या बाल खेळाडुंनी लॉकडाऊन मध्ये लावली झाडे

0
593

अकोटःशहरातील पीच्याक सिल्याट च्या खेळाडूनी आपल्या घरी तथा घराजवळील परिसरात झाडे लावलीत. लाॕकडांऊनमध्ये अनेकांनी अनेक छंद जोपासला सुरुवात केली असली तरी या युवा दोस्तांनी नीरोगी पर्यावरणासह सुदृढ आरोग्यासाठी घरी मार्शल आर्ट चे धळे घेत सोबत एक नवीन उपक्रम राबविला आहे.

लॉकडाऊन लागल्या मूळे मार्शल आर्ट वर्ग आणि शाळा बंद पडल्या मुळे विद्यार्थी हे आपले शिक्षण ऑनलाईन घेत आहे पण मार्शल आर्ट चा सराव पण घरी करत आहे.यामधील काही खेळाडू हे उच्च पातळी वर खेळलेले आहेत. उन्हाळ्याची चाहुल लागली आहे.सर्वाना सावली व ऑक्सिजनची आवश्यकता असते त्यामुळे झाडे लावा…झाडे जगवा.. जीवन वाचवा…असा संदेश देत सर्वाना एक झाड लावण्याचा संदेश दिला आहे

.या उपक्रमामध्ये नव्या बोंद्रे, मिताली राठी,निराली राठी,प्राची गोरे,प्रज्ञा गोरे,बसवराज दसोडे,दयानंद दसोडे,पूर्व गोरे,संस्कृती कोकाटे,हर्षवर्धन दसोडे,स्वराज गलांडे, कु इंगळे व ईतर खेळाडूंनी विविध झाडे लावलीत

.या सर्वांनी पीच्याक सिल्याट चे अकोला जिल्हा अध्यक्ष रवींद्र मालखेडे, सचिव तथा प्रशिक्षक आकाश धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला याउपक्रमाला शरद हिंगणकर, दीपक सासणे,योगेश जोंधळे,दीक्षा शेवाळे चंद्रकांत लाटेकर राहुल आठवले या सर्वांनी शुभेच्छा दिल्या व त्यांचे कौतुक केले.