ब्रेकिंग :- कोरोनामुळे दगावणाऱ्यांचा संख्येत वाढ – पहा यादी

0
3095

अमरावती, दि. 2 : जिल्ह्यात गत चोवीस तासात बारा कोरोनाबाधित रुग्ण दगावले आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या छांगाणीनगरातील 64 वर्षीय पुरुष व्यक्तीचा जिल्हा कोविड रुग्णालयात, लोणी टाकळी येथील 65 वर्षीय पुरूष यांचा जिल्हा रूग्णालयात, अमरावतीच्या ओम कॉलनीतील 82 वर्षीय पुरुषाचा जिल्हा कोविड रूग्णालयात, मोर्शी येथील 78 वर्षीय पुरूष व्यक्तीचा दुर्वांकुर रूग्णालयात, अमरावतीच्या खोलापुरीगेट येथील 76 वर्षीय महिलेचा जिल्हा कोविड रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

            कारंजा लाड तालुक्यातील धनज येथील 71 वर्षीय पुरूष व्यक्तीचा जिल्हा कोविड रूग्णालयात, अमरावतीतील यशोदानगरातील 52 वर्षीय पुरूष व्यक्तीचा जिल्हा कोविड रूग्णालयात, दर्यापूरातील 70 वर्षीय पुरुष व्यक्तीचा जिल्हा कोविड रूग्णालयात, वरूडच्या लक्ष्मीनगरातील 75 वर्षीय पुरुष व्यक्तीचा जिल्हा कोविड रूग्णालयात, अमरावतीच्या जयस्तंभ चौक परिसरातील 80 वर्षीय पुरुष व्यक्तीचा बेस्ट रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

                        अमरावतीच्या प्रशांतनगरातील 80 वर्षीय पुरूष यांचा पीडीएमसी रूग्णालयात, तर छाया कॉलनीतील 63 वर्षीय पुरूष व्यक्तीचा जिल्हा कोविड रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

     जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या 533 वर पोहोचली आहे.