तिसऱ्या दिवशी बेपत्ता असलेल्या चांदूर रे. मधील युवकाचा मृतदेह आढळला ; कौडण्यपूरच्या वर्धा नदीपात्रात मंगेशने संपविली जीवन यात्रा

0
1746

 

चांदूर रेल्वे – (ता. प्र.)

गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चांदूर रेल्वेतील युवकाचा मृतदेह अखेर कौडण्यपूर येथील नदीपात्रात आज दिनांक ३ मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान आढळला. नदीकाठावर मोबाईल सापडल्यामुळे सदर युवकाचा शोध लागला असल्याचे सांगितल्या जात आहे. परंतु आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट आहे.

चांदूर रेल्वे शहरातील शेंद्रीपुरा येेथील रहिवासी असलेला मंगेश लक्ष्मण चौधरी (वय ३२ वर्ष) हा युवक १ मार्चला दुपारी २ वाजतापासून बेपत्ता होता. अखेर त्याचा मृतदेह आज सापडला आहे.