*सोळा रेतीघाटांच्या लिलावासाठी ई- निविदा*

0
1122
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 4 : जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, वरूड, मोर्शी, दर्यापूर व धारणी पाच तालुक्यांतील 16 रेतीघाटांची ई- लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

या प्रक्रियेचा तपशील https://amravatico.abcprocure.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असून, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरही (अमरावती.एनआयसी.इन) तो उपलब्ध असेल. लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यापूर्वी नव्याने नोंदणी करणे व डिजीटल सर्टिफिकेट काढणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, निविदाधारकाकडे पॅनकार्ड, जीएसटी रजिस्ट्रेशन (जीएसटीएन कार्ड) असणे आवश्यक आहे, असे अपर जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

000