Amravati Breaking :- विभागीय चौकशी प्रकरणी मुख्याध्यापिका बडतर्फ

1894

अमरावती, दि. 4 : नांदगावपेठ येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापिका चंद्रकला खर्डेकर यांना विभागीय चौकशीप्रकरणी शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने कळवली आहे.

श्रीमती खर्डेकर यांना बडतर्फ केल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. हे आदेश शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या श्रीमती खर्डेकर यांच्या पाचही पत्त्यांवर पाठविण्यात आले. मात्र, श्रीमती खर्डेकर या पत्त्यांवर आजमितीला राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्याबाबत विभागीय चौकशीत निष्कर्ष लक्षात शासकीय सेवेतून त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षणाधिका-यांनी कळवली आहे.

जाहिरात