तालुक्यातील श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सव रद्द…गजानन महाराज विहीर संस्थान व मुंडगाव येथे पोलीसाचा तगडा बंदोबस्त

509

आकोटःसंतोष विणके

तालुक्यातील श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सव रद्द करण्यात आला असून दोन्ही ठिकाणी पोलीस विभागातर्फे तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.अकोट शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना ससंर्ग वाढत असल्यामुळे लाॅकडाऊन ८मार्च पर्यत वाढवण्यात आले आहे तसेच सर्व प्रकारचे सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत तरी दिनांक ५मार्च रोजी पोपटखेड रोडवरील शांतीवन अमृततिर्थ( विहीर)संस्थान भक्ताच्या दर्शनाकरीता बंद ठेवण्यात आले आहे तसेच अकोट तालुक्यातील मुडगांव पादुका संस्थान, सुद्धा भाविकाच्या दर्शनाकरीता बंद करण्यात आले आहे तरी समस्त श्री च्या भक्तांनी श्री चा प्रगट दिवस आपआपल्या घरीच साजरा करावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला असून कुणालाही मंदिर परिसरात प्रवेश मिळणार नसल्याने भाविकांनी घरीच राहून श्रींची आराधना करावी व कायदा-सुव्यवस्था राखत लॉकडाऊनचे नियम पाळावे असे आवाहन ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी विदर्भ24 न्यूजशी बोलताना दिली.

जाहिरात